रुपाली भोसले घरातून बाहेर

    दिनांक :05-Aug-2019
'बिग बॉस मराठी सीझन २' महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एंट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकले पासून सगळ्यांनाच फैलावर घेतले... या आठवड्याच्या भागामध्ये देखील सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली... अभिजीत बिचुकले यांनी घरातील काही काम करण्यास नकार दिला,त्यांना महेश मांजरेकर यांनी कडक शब्दामध्ये खडसावले आणि कुठलेही काम करणे कमीपणा नसतो, घरातील नियम हे पळावेच लागतात असा सल्ला दिला... तर शिव, वीणा आणि अभिजीत केळकरची देखील कानउघडणी केली.
 
 
 
 
शिवला असे देखील सांगितले तू चांगला खेळतोस, बिग बॉसचा विजेता होण्याचे गुण तुझ्यात आहेत. परंतु, वीणाची नेहमी वकिली करत असतोस त्यामुळे तू वाईट ठरतोस आणि वीणा विक दिसते. तर महेश मांजरेकर यांनी शिवची आई आणि अभिजीतच्या मुलाचा कौतुक केले की, त्याच्या मुलाला सगळ्यांची नवे माहिती होती... सदस्यांमधील गंमत, वाद विवाद सुरू राहिले... पण तो महत्वाचा क्षण आला ज्यामध्ये दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असते. या आठवड्यामध्ये हीना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रूपाली नॉमिनेट झाले होते... रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रूपालीला मत कमी मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून बाहेर जावे लागले. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर रूपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर एव्ही दाखविली... एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले. रूपाली म्हणाली मी हे ठरवले होते की मी तुला वाचवेन जेव्हा मी इथे उभे असेन... रुपालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर तिचे लग्न लंडनस्थित एका व्यक्तीसोबत झालेले होते. त्याचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. तो आयटी क्षेत्रात काम करणारा असून लग्नाच्या काहीच वर्षांनंतर रुपाली भारतात परतली.
सुरेखा यांच्याशी गप्पा मारताना रुपालीने सांगितले होते की, माझ्या आई वडिलांना सांभाळेल असाच जोडीदार मला हवा आहे. माझे आई-वडील ही माझी प्रायोरिटी आहे. माझ्या भावाने त्यांना सांभाळावे असे मला कधीच वाटत नाही. माझे लग्न झाल्यानंतर मी काही वर्षं लंडनला होते. पण माझ्यासाठी हा अनुभव अतिशय वाईट होता. मी सात वर्षं खूप काही सहन केले आहे. मी नेहमीच कुटुंब आणि घर सांभाळणारी आहे. पण तरीही मला माझ्या नात्यात सुख मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा कोणत्याही नात्यात पडताना मी अनेकवेळा विचार करेन. तसेच माझ्या जवळच्या अनेक मैत्रिणींची लग्न होऊन ती तुटलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मला लग्नाची भीती वाटते. मी पुन्हा कोणत्या नात्यात अडकेल का याविषयी मला देखील माहीत नाहीये.