धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी घेतले विष

    दिनांक :05-Aug-2019
अकोला,
 
राष्ट्रीय महामार्गाची अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना आज ५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. सहाही शेतकऱ्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

साजिद इकबाल शेख महेमूद,अफजल गुलाम नबी रंगारी, अर्चना मदन टकले, मुरलीधर प्रल्हाद राऊत, मदन कन्हैयालाल हिवरकर, काशीराव राऊत अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.