भाजपा संघटना वाढविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांचे महत्वपुर्ण योगदान

    दिनांक :06-Aug-2019
नगराध्यक्ष तथा विधानसभा संयोजक शालुताई दडवंते यांचे प्रतिपादन
आरमोरी विधानसभा क्षेत्रातुन ६ हजार राख्या पाठविणार असल्याची माहिती
कुरखेडा,
भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणावर योगदान असुन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये स्थापन झालेल्या राज्य शासनाने महिलांच्या सर्वागिण विकासासाकरिता विविध कल्याणकारी योजना आणल्या असुन महिलांना सक्षम करण्याच्या प्रयत्न केल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्रजी फडणविस यांना भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा च्या वतीने २१ लाख राख्या पाठविण्याचा संकल्प केला असुन आरमोरी विधानसभा क्षेत्रातुन ६ हजार राख्या पाठविण्यात येणार असल्याची माहिती वडसाच्या नगर अध्यक्ष तथा शक्ती सन्मान कार्यक्रम आरमोरी विधानसभा संयोजक शालुताई दडवंते यांनी दिली.
ते कुरखेडा भाजपा कार्यालयात महिला आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी अभियान विधानसभा सहसंयोजक डाँ संगिता रेवतकर जिल्हा सचिव विलासराव गावंडे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा कुरखेडा प्रभारी चांगदेव फाये कुरखेडा नगर अध्यक्ष रविद्र गोटेफोडे महिला आघाडीचे पदाधिकारी माजी जि प सदस्य शोभाराणी सयाम जिल्हा परिषद सदस्य गिताताई कुमरे तालुका महिला आघाडी अध्यक्ष जयश्री मडावी महामंञी अहिल्याबाई लोथे संगिताताई टेकाम कुरखेडा पंचायत समिती सदस्य कविताताई गुरनुले वनिताताई कोनपत्तीवार चंद्रकला गेडाम तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विनोद नागपुरकर कार्यालय प्रमुख बंटी देवाढगले आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना नगराध्यक्ष शालुताई दडवंते पुढे म्हणाले कि भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी महिलांचे योगदान खुप मोलांचे असुन माझ्या सारख्या सर्वसामान्य महिलांना नगराध्यक्ष होण्याचा मान पक्षाने दिला असुन पक्षाने कार्य महिला पर्यत पोहचविण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करित महिला पर्यत शासनाच्या योजना माहिती या अभियानाच्या माध्यमातुन देत असल्याचे सांगितले.
 
 
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना संगिता रेवतकर यांनी केंद्र व राज्य सरकार यांनी महिलाकरिता उल्लेखनीय कार्य केले असुन उज्वला गँस योजना प्रत्येक घरा पर्यत पोहचवुन महिलांना होणारा ञास दुर केला तसेच महिला सन्मान योजना माझी कन्या भाग्यश्री तसेच विविध योजना राबविल्या आहेत यामुळे महिलांची प्रगतीकरीता वाटचाल सुरू असुन महिला बचत गट माध्यमातून महिला मोठ्या प्रमाणावर पुढे येत असुन भारतीय जनता पार्टी मध्ये महिला सहभागी होत आहेत व महिला संघटना वाढविण्याकरिता आपले कार्य करीत असल्याचे प्रतिपादन केले. या अभियान अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या वतिने राबविलेले विविध योजनाचे पत्रक महिलांना देण्यात असुन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांना राख्या पाठविण्यात येणार असुन काही राख्या ह्या भारतीय सैनिकांना महिला मोर्चा वतिने पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी भाजपा महिला पदाधिकारी यांनी महिला कडुन गोळा केलेल्या राख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जमा सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रम यस्ववीतेसाठी युवा मोर्चा महिला कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.