लडाख : रोमांचकारी अनुभव!

    दिनांक :06-Aug-2019
•मुक्ता राम महाजन
 
भाग २
 
1 जूनला पहाटेच प्रवासाला सुरुवात केली कारण यावेळी काहीतरी भन्नाट पहाण्यासाठी थोडी मेहनत लागणार होती. एकूण 135 किमीचा प्रवास, वेळ जवळपास 5-5.30 तास एवढा आणि तोही घाटाच्या सस्त्यातून एका पहाडावरून दुसर्‍या पहाडावर आम्ही जायला लागलो. पहाडं चढतोय्‌ म्हटल्यावर समुद्र सपाटीपासूनची उंची बदलणारचं. दोन तास प्रवास केल्यावर आम्ही 74 किमीचा प्रवास संपवला आणि चांगला पास येथे पोहोचलो. आणि बघतो तर काय, हिमाच्छादित पहाडांनी आम्हाला मिठीत घेतल होतं. बर्फच बर्फ आम्ही सध्या 17,590 फुटांवर होतो. आठवणी म्हणून भरपूर फोटो काढले आणि ‘पँगोंग लेक’साठीचा प्रवास पुन्हा सुरू केला. तिथे पोहोचेपर्यंत कंटाळा आला होता, घाटाच्या रस्त्यांना थकलो होतो, उभ्या-आडव्या धक्क्यांनी शरीर अकडले की काय, असे वाटत होते. 
 
 
परंतु लहान मुुलाच्या निर्मळ आणि पारदर्शक मनासारखे जेव्हा‘पँगोंग लेक’चे पाणी पाहिले, तेव्हा समुद्रातील लाटांप्रमाणे उफळणारे मनातील प्रश्न तलावातील पाण्याप्रमाणे अगदी स्थिर आणि शांत झाले. आम्ही ‘पँगोंग लेक’ सौंदर्य आमच्या डोळ्यात सामावून घेऊ लागलो. एकाच वेळी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आम्ही त्या पाण्यात पाहिल्या. सुमारे 700 स्के. किमी इतका अफाट तो ‘लेक’ आहे, 30 टक्के आपल्या देशात तर उरलेला भाग चीनमध्ये आहे. या लेकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे अतिशय प्रसिद्ध ‘थ्री इडियट्‌स’ या सिनेमाचे शूट झाले आहे. पाऊण-एक तास ‘थ्री इडियट्‌स’ लेकवर घालवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतताना ‘थ्री इडियट्‌स’मध्ये दाखवलेली फुंसुक बांगडू यांची शाळा देखील पाहिली व लेह शहराची िंसधू नदीच्या दर्शनाचा लाभ घेऊन रात्री हॉटेलला आश्रय घेतला.
 
3 जून 2019 ला पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आजही जाण्याचा प्रवास जरासा त्रासदायक होताच पण आज परती लेहला नव्हती. एकूण 160 किमीचा प्रवास होता आणि नुब्रा व्हॅली हे ठिकाण 40 किमीचा प्रवास झाल्यावर आम्ही खरदुंगला पास येथे पोहोचलो. मोटारगाडीने पोहोचू शकू, असे सर्वात उंच ठिकाण उंची 18,300 फुट पुन्हा एकदा बर्फाच्या डोंगराची कमतरता एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये देखील एक खरोखरच कौतुकास्पद बाब जाणवली आणि ती म्हणजे सतत तत्पर, कर्तव्यदक्ष आणि देशपे्रमी भारतीय सैन्य, ज्या ठिकाणी वस्तीचा आणि जीवनाचा काही अंशच नाही. अशाा ठिकाणी देखील भारतीय सैन्य आपली हत्यारे घेऊन, सशस्त्ररीत्या, हसर्‍या चेहर्‍याने देशाची, आपली रक्षा करत उभे होते. प्रवाशांसाठी भारतीय सैन्याने केलेली कॅफेची व्यवस्था तसेच ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे सर्व वैद्यकीय उपचार व ऑक्सीजन सििंलडर याची देखील व्यवस्था अतिशय उत्तम होती. भारतीय सैनिकांबरोबर फोटो काढून आणि भारतमातेच्या जयजयकाराचे नारे लावून आम्ही नुब्रा व्हॅलीकडे निघालो.