दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यावर प्राणघातक हल्ला

    दिनांक :06-Aug-2019
हिंगणघाट,
अवैध मदिराविक्री विरुध्द कर्दनकाळ ठरलेल्या दारुबंदी महीला मंडळाच्या अध्यक्ष पुजा प्रविन काळे यांच्यावर काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान गुंड प्रवृतीच्या चार लोकांनी प्राणघातक हल्ला केला. वेळीच पुजा चे वडील व परीसरातील नागरीकानी धावून आल्याने पूजाचा जीव वाचला. 

 
 
सविस्तर वृत्त असे की, पुजा प्रविण काळे या संत तुकडोजी दारुबंदी महीला मंडळ या संघटनेच्या अध्यक्ष आहेत गेल्या तिन वर्षा पासुन शहरातील डागंरी वार्ड परीसरातील अवैध मद्य विक्रेत्यां विरुध्द महीला सदस्यांच्या साथीने लढा देत आहे म्हणुन पुजा काळे यांचा काटा काढण्याकरिता करीता काल चार आरोपीनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गणेश भांगे, संदिप थुटरकार , श्याम पांडे व नविन गोडे ही आरोपींची नावे आहेत. पुजाचा गळा कापुन जिव घेण्याचे आरोपी जोरजोरात ओरडुन सांगत असताना गणेश भांगे यांने चाकुने सपासप वार केले या वेळी तीला डोक्याला. हाताच्या मनगटाला , पाठ व छाती वर वार करण्यात आले .या नंतर आरोपीनी तेथुन पलायन केले. नंतर लगेच तिच्या पती व वडिलाने तिला जवळच्या उपजिल्हा रुण्नालयात उपचारा करीता दाखल केले तेथील महीला वैघकीय अधिकाऱ्याने सेवाग्राम रुग्णालयात पुढिल उपचारार्थ पाठविले.
 
शहरात अवैध दारु विक्री विरोधी महिला संघटना काम करीत असताना पोलीस प्रशासनातील अधिकारी सहकार्य देण्याचे आश्वासन देतात पंरतु त्याचे काही कर्मचारी अधिकारी थोडे आर्थीक लाभाकरीता दारु विक्रेत्याना छुपे सहकार्य करतात यातुनच हा प्रकार घडला असुन पोलीसानी धडक कार्यवाही करुन महिलांचे मनोर्धेर्य वाढविने गरजेचे आहे. कालच्या घटनेनंतर रात्री पुजा वर उपचार सुरु असताना शहराचे ठाणेदार बंडीवार यांनी स्वतः हजर राहून त्यांना धीर दिला.
दारुबंदी करण्याकरीता शासनाने अबकारी विभाग निर्माण केला आहे पंरतु त्यांचे कार्य शुन्य आहे . यामुळे त्यांच्याही कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.