अमरावतीत तीन तलाकचा पहिला गुन्हा दाखल

    दिनांक :07-Aug-2019
शिरजगाव कसबा, 
संसदेत तीन तलाक विधयेक मंजूर झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातला पहिला गुन्हा शिरजगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला असून प्रकरण करजगाव येथील आहे. या प्रकरणात पिडीतेच्या तक्रारीवरून बुधवारी तब्बल सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
 
 
मादिहा फिरदोस मुख्तार अहेमद (22, रा. करजगाव, ता. चांदूर बाजार) ह.मु. तळेगाव मोहना ता. चांदूर बाजार असे तीन तलाक पिडीत महिलेचे नाव आहे. सदर महिलेचे लग्न फिरदोस मुख्तार मंजूर अहेमद खान याच्यासोबत झाले होते. काही दिवस आंनदाने गेल्यानंतर सदर महिलेचा लग्नात आंदन कमी मिळाले छळ सुरू झाला. माहेरवरुन अजून आंदन व गाडी आणण्याची मागणी करून पती फिरदोस मुख्तार मंजूर अहेमद खान, सासू, सासरे, दोन नणंद, दीर व एक नंदई अशा एकूण 7 जणांनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला.
 
त्यामुळे महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर तडजोडीसाठी पिडीतेच्या माहेरी तळेगाव मोहना येथील तिचे वडीलाच्या घरी बैठक बसली असता पती फिरदोस खान याने तेथे हजर असलेल्या लोकांसमक्ष फिर्यादीला तीन वेळा तलाक,तलाक,तलाक हा शब्द उच्चारुन तलाक दिला, अशा फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिरजगाव पोलिस करीत आहे. विधेयक मंजूर झाल्याने दाद मागण्याची संधी मुस्लिम महिलेला मिळाली आहे.