गरिबीला कंटाळून दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा

    दिनांक :07-Aug-2019
तिवसा,
मोल मजुरी करणार्‍या पती - पत्नीने गरिबीला कंटाळून राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्‍हा येथे मंगळवारी रात्री घडली. 
 
 
नरेंद्र श्रीराम मलकाम व पूजा नरेंद्र मलकाम असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे, या दोघांनी आपल्या राहत्या घरात दोन वेगवेगळे दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार मलकाम कुटुंब हे चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथून 7 वर्षांपासून वर्‍हा येथे राहायला आले होते. दोघेही शेतात काम करून आपला संसार चालवत होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. कुर्‍हा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने मलकाम दाम्पत्याचे दोन चिमुकले निराधार झाले आहेत.