शिवानी करतेय ‘ही’ गोष्ट मिस!

    दिनांक :08-Aug-2019
बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन आता ७१ दिवस उलटून गेले आहेत. इतके दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहिलेल्या स्पर्धकांना आता घरातल्यांची आठवण येऊ लागली आहे. त्यातच शिवानी सुर्वेला देखील तिच्या घरातल्यांची आठवण येत आहे. त्यातच आज आंतररष्ट्रीय मांजर दिन असून ती तिच्या मांजरांना प्रचंड मिस करत असल्याचं तिने बिग बॉसच्या अनसीन अनकटच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.
 
 
 
शिवानीला मांजर हा प्राणी प्रचंड आवडतो. त्यामुळे तिच्या घरीदेखील एक सोडून तीन-तीन मांजरी आहेत. विशेष म्हणजे या मांजरी तिच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच बिग बॉसच्या घरात गेल्यापासून शिवानी या मांजरींना प्रचंड मिस करत आहे. बिग बॉसच्या अनसीन अनकटच्या व्हिडीओमध्ये या मांजरांसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. त्यासोबतच या मांजरी तिच्या घरी कशा आल्या हेदेखील तिने सांगितलं.
“सुरुवातीला माझ्या घरी तपकिरी रंगाचा बोका आला. त्याच्या रंगावरुन आम्ही त्याचं नाव ब्रुनो असं ठेवलं. त्यानंतर काळी-पिवळी, तपकिरी रंगाची मांजर आली.तिचं नाव माझ्या आईने सखी ठेवलं. आणि नंतर पांढरी शुभ्र रंगाची मांजर आली. तिचं नाव स्नो आहे. गेम ऑफ थ्रोन्स मधला जॉन स्नो पाहून मी त्या मांजरांच नाव स्नो ठेवलं. प्रत्येक मांजराचे स्वभाव-आवाज वेगवेगळे आहेत. हे तीनही मांजरं मला प्रचंड आवडतात”, असं शिवानी म्हणाली.
पुढे ती म्हणते,“माझी तिनही मांजरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवरही आली आहेत. मग ते मुंबई असो की पुणे, माझ्या प्रत्येक आउटडोअर सेटवर माझी मांजरं आली आहेत. पण बिग बॉसच्या शोचा फॉर्मटच वेगळा असल्याने मी त्यांना माझ्यासोबत आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना आता मी मिस करतेय.”
दरम्यान, घरातल्यांना मिस करणारी शिवानी बिग बॉसच्या घरातील एक उत्तम स्पर्धक म्हणून ओळखली जाते. स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे शिवानी कायम चर्चेत असते.