शाळेच्या बाथरुममध्ये शिरला बिबट्या

    दिनांक :08-Aug-2019
भद्रावती,
भद्रावती तालुक्यातील सावरी येथील जिल्हा परिषद शाळेतील बाथरुममध्ये बिबट शिरल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ११ वाजता सावरी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू बलकी हे बाथरुममध्ये गेले असता त्यांना आत कुणीतरी असण्याचा भास झाला. त्यांनी दरवाजा उघडला असता आत त्यांना बिबट दिसला. त्यांनी बाथरूमचा दरवाजा बंद करून या बाबतची सुचना इतर शिक्षकांसह नागरिकांना दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी रवाना झाले असून या शाळेसमोर बिबट पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.