परेश रावल यांचं मराठी नाटकात पदार्पण

    दिनांक :08-Aug-2019
बॉलिवूडचे दमदार अभिनेते परेश रावल लवकरच मराठी नाटकात पदार्पण करत आहेत. ‘महारथी’ हे त्यांच्या मूळ गुजराती नाटकांचं मराठीत रुपांतर होत आहे. परेश रावल या मराठी नाटकात अभिनय करणार नसून ते फक्त याचे निर्माते आहेत.
 
 
 
विशेष म्हणजे मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये सातत्यानं दिसणारा सचित पाटील ‘महारथी’ या नाटकाच्या निमित्ताने एकोणीस वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकात तो मुख्य भूमिकेत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिनेविश्वात काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षेतून इंदूरहून मुंबईला आलेल्या एका तरुणाची भूमिका सचित या नाटकात साकारत आहे. एका श्रीमंत सिनेनिर्मात्याकडे तो नोकरीला लागतो. त्या तरुणाची महत्त्वाकांक्षा आणि निर्मात्याच्या बंगल्यातलं गूढ उलगडणारं हे नाटक आहे.