‘प्रस्थानम’चे पोस्टर प्रदर्शित

    दिनांक :08-Aug-2019
अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता संजय दत्त एका नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘प्रस्थानम’ असे आहे. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
 
 
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त एका सिंहासनावर बसलेला दिसत आहे. दरम्यान पोस्टवर ‘यह गद्दी विरासत से नहीं, काबिलियत से मिलती है’ असे लिहिले आहे. यावरुन हा चित्रपट राजकारणावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. पोस्टरमध्ये संजय दत्त एक नेत्याच्या रुपात दिसत आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे पोस्टवर लिहिले आहे.
‘प्रस्थानम’ हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यामध्ये संजय दत्त आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अली फजल आणि अमायरा दस्तुरदेखील या चित्रपटात झळकणार आहेत.
थ्रिलर फॅमिली ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा आणि मनिषाची जोडी तब्बल दहा वर्षांनी एकत्र पाहता येणार आहे. याआधी १९९२ मध्ये ‘यल्गार’ चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केले होते. ज्यानंतर दोघांच्याही बॉलिवूड कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती.