'मिशन मंगल'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :08-Aug-2019
मुंबई,
अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षीत 'मिशन मंगल' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्रोकडून लाँच करण्यात आलेल्या मंगळयानावर आधारित आहे. मिशन मंगलचा हा दुसरा ट्रेलर लाँच होताच काही मिनिटांतच त्याला लाखो ह्यूज मिळाले आहेत.
 
 
 
अक्षयनं ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ' सात वेळा खाली पडा...पण आठव्यांदा उठा! ही गोष्ट आहे कधी न हार मानन्याची' अशा कॅप्शनसहीत त्यांनं हा ट्रेलर शेअर केला आहे. महिला सक्षमीकरण आणि देशभक्ती अशा मुद्द्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) वर आधारित असून अक्षय कुमारनं यात एका वरिष्ठ वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. रशिया, अमेरिका आणि युरोपियन देशानंतर मंगळावर पोहोचणारा भारत चौथा देश बनला आहे.
'मिशन मंगल'च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार सोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ती कुल्हाडी आणि शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.