अमरावतीच्या श्रीनिवासला राष्ट्रीय पुरस्कार

    दिनांक :09-Aug-2019
- 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा
अमरावती,
नाळ चित्रपटात निरागस चैत्याची भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान मिळविणार्‍या अमरावतीच्या श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला आहे.
 
 
 
केंद्र शासनाकडून 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘भोंगा’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘पाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ हे मराठी चित्रपट विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम ठरले असून मराठी चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. ’नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्तम बालकलाकारासाठी यावर्षी चार बालकलाकारांची निवड झाली आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक राहुल रवैल आणि सदस्यांनी शास्त्रीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2018 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. सुधाकर रेड्डी येंकटी दिग्दर्शित आणि मृदगंध फिल्म्स निर्मित ‘नाळ’ देशातील दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
नाळ चित्रपटातील लहान मुलगा चैतन्य उर्फ चैत्या याच खरं नाव श्रीनिवास गणेशराव पोकळे असे आहे. नाळ चित्रपटासाठी सिलेक्शन तेंव्हा तो दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तो चित्रपटासाठी सिलेक्ट कसा झाला त्याचीही एक भन्नाट कहाणी आहे. दस्तुर नगर, अमरावती येथील गणेशराव पोकळे व अर्चना पोकळे या दाम्पत्याचा श्रीनिवास मुलगा.१३ मार्च २००९ त्याचा जन्म झाला. नाळ चित्रपटाची टीम चैत्याच्या भूमिकेसाठी खोडसर आणि फिल्मला साजेशा मुलाच्या शोधात होती. श्रीनिवास पोकळे हा अमरावतीच्या “द्वारकानाथ अरोरा इंग्लिश प्रायमरी स्कूल” मध्ये दुसऱ्या इयतेत शिकत होता, त्याला पाहताच तो नाळच्या टीमला साजेसा वाटला. त्याच रांगडं बोलणं, चालणं, मनमुराद हसणं चैत्याच्या भूमिकेसाठी अगदी योग्य होत. श्रीनिवासच सिलेक्शन झालं घरच्यांची तसेच शाळेची परमिशन घेतली आणि काही दिवसातच अभिनय शिकण्यासाठी नाळ चित्रपटाची टीम त्याला पुण्याला घेऊन आली. पुण्यात चित्रपटासाठी १५ दिवसांचं शिबीर होत. त्यात कॅमेऱ्यासमोर कस राहायचं, डायलॉग कसे बोलायचे, हावभाव कसे द्यायचे हे त्याला शिकवण्यात आलं. अवघ्या ७ वर्षाचा श्रीनिवास तेथे चांगलाच रुळला आणि सिन साठी परिपकव झाला. श्रीनिवास पोकळे हा शूटिंग आधीही रांगडं बोलायचं त्यामुळे चित्रपटासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.