"माझ्या आयुष्यावर चित्रपट बनू शकतो"

    दिनांक :01-Sep-2019
मुंबई,
सोशल मीडियावर सध्या राणू मंडलचीच चर्चा रंगली आहे. एका व्हिडिओमुळं रातोरात स्टार झालेल्या राणूला आता आपल्या जीवनावर चित्रपट व्हावा अशी इच्छा आहे. अलीकडेच तिनं एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली आहे.
 

 
'माझ्या आयुष्याची कथा खुप मोठी आहे. मी खुप चढ-उतार पाहिले आहेत. माझ्या आयुष्यावर नक्कीच चित्रपट बनू शकतो. जर खरंच माझ्यावर चित्रपट झाला तर तो खास चित्रपट असेल.' असं राणूनं म्हटलं आहे.
राणू मंडल पश्चिम बंगाल येथे राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेनं गाणाऱ्या राणूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राणूला आता अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात येत आहे. एका कार्यक्रमाच्या टीमनं तिचा मेक ओव्हर केला. या मेकओव्हरमुळं तिचा लूक पुर्णपणे बदलण्यात आला. नुकतचं राणूनं हिमेश रेशमियाच्या 'हॅपी हार्डी अँन्ड हीर' या चित्रपटातील 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गायलं आहे. या गाण्यासाठी सहा ते सात लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.