अद्ययावत वैकुंठ रथाचे झाले लोकार्पण

    दिनांक :01-Sep-2019
समाजसेवेच्या क्षेत्रात लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टचे महत्वाचे पाऊल
चिखली, 
रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर असलेल्या लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मागील एक वर्षांपासून गरजू रुग्णांना आवश्यक असलेले साहित्य मोफत उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने आता मरणोत्तर सेवा - सुविधा पुरवण्याचा वसा घेतला आहे. लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टने तयार केलेल्या अद्ययावत वैकुंठ रथाचे लोकार्पण श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ चे स्वामी हरीचैतन्यानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
 

 
लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या एक वर्षांपासून गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या वस्तू व उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजवर हजारो लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या रुग्णसेवेचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने संस्थेने पुढील महत्वाचे पाऊल उचलले आहे. मरणोत्तर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रस्टकडून अद्ययावत स्वरूपाचा वैकुंठ रथ तयार करण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचे लोकार्पण स्वामी हरीचैतन्य सरस्वती यांच्या हस्ते आणि बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात आले. डि. पी. रोडवरील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमाकरिता नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे, भाऊसाहेब लाहोटी, घनश्याम भाला, नंदकिशोर लढ्ढा, सतीश गुप्त, राधेश्याम जाजू, रमेश बाहेती, प्रेमराज भाला, अॅड. विजय कोठारी, बंडूभाऊ तिवारी, गोविंद गिनोडे यांची विशेष उपस्थिती होती . या वेळी बोलत्तांना स्वामी हरीचैतन्य सरस्वती महाराज यांनी " नर सेवा हीच नारायण सेवा " या तत्त्वानुसार लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था एक वर्षांपासून रुग्णसेवेचे कार्य करीत आहे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले . राधेश्याम चांडक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत्तून सामाजिक बांधिलकी म्हणून समाजकारण करण्याची व ते प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्याचा लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई राजेश चांडक यांचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन केले .
या वेळी प्रकाशबुवा जवंजाळ, रामकृष्णदादा शेटे, प्रल्हाद शर्मा, राजेंद्र व्यास दिनेश देशमुख, कुणाल बोंद्रे, सुहास शेटे, शरद भाला, पंडितराव देशमुख, रामदासभाऊ देव्हडे, दीपक देशमाने, गोपाल देव्हडे, शैलेश बाहेती,डॉ. प्रकाश शिंगणे, अनुप महाजन हेमंत शिसोदिया, आशीष बोंद्रे आणि अशोक सुरडकर हे प्रमुख उपस्थिती होती .
आपल्या प्रास्ताविकात रजत चांडक यांनी सांगितले कि डि. पी. रोडवरील चांडक कॉम्प्लेक्स येथे संस्थेचे कार्यालय आहे. येथूनच गरजू रुग्णांना आवश्यक असलेले अॅडजेस्टेबल बेड, अॅक्वा बेड, एअर बेड, वॉकर, लॅट्रीन चेअर, व्हील चेअर, कुबड्या, नेब्युलायझर, अत्याधुनिक आॅक्सिजन काँसंट्रेटर मशीन आणि सर्व सुविधांनी युक्त शवपेटी अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येते. चिखली शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ आजवर घेतला आहे. कार्यक्रमाचे संचालन पवनकुमार लढ्ढा यांनी केले तर आभार जयंत शर्मा यांनी केले . कार्यक्रम यशस्वितेसाठी लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टचे राजेश चांडक ,विनोद नागवणी व इतर सर्व सदस्यांनी सहकार्य केले .