36 गावात होणार एक गाव एक गणपतीची स्थापना

    दिनांक :01-Sep-2019
आज गणपती बाप्पा चे आगमन
 
कारंजा लाड,
कारंजा शहरात एकूण 39 गणपती मंडळाची तर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 50 गणपती मंडळाची स्थापना होणार आहे. त्याचप्रमाणे शहर पोलिस स्टेशन अंतर्गत नऊ गावात एक गाव एक गणपती तर ग्रामीण भागात 36 गावात एक गाव एक गणपती स्थापना होणार आहे.
 

 
शहरातील व तालुक्यातील जनतेनी यावर्षी गणपतीबाप्पाची आगमना निमित्त जोरदार तयारी केली आहे शहरातील व ग्रामीण भागातील गणपती मंडळांना ऑनलाइन परमिशन देण्यात आली. वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी यावर्षी दहा दिवस चालणार्‍या उत्सवानिमित्त मंडळासमोर कोणत्याही प्रकारचे डीजे वाजविण्यावर नियंत्रण ठेवले आहे. नियंत्रणाबाहेर जे मंडळ ध्वनिप्रदूषण करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ नये. यासाठी वसंत परदेशी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी प्रत्येक गणेश मंडळातर्फे एका सदस्याला पोलिस मित्र म्हणून निवडले आहे. दहा दिवस चालणार्‍या उत्सवानिमित्त कोणताही मंडळाकडून अनुचित प्रकार घडू नये. यासाठी तो सदस्य पोलिस मित्र म्हणून काम करणार आहे अनुचित प्रकाराची तोच माहिती देणार आहे त्यामुळे हा उपक्रम डोळ्यासमोर ठेवून सर्व मंडळांनी पोलिस अधीक्षक यांना शब्द दिला आहे की, आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यावर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना चांगल्या प्रकारे शहरात व ग्रामीण भागात रुजू झाली आहे. शहर पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण नऊ गावात तर ग्रामीण भागातून 36 गावांमध्ये एक गाव एक गणपती ची स्थापना होणार आहे. या दहा दिवस चालणार्‍या उत्सवासाठी शहर पोलस स्टेशन व ग्रामीण पोलिस स्टेशन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.