मुंबई विमानतळावर पकडले १७ किलो रक्तचंदन

    दिनांक :10-Sep-2019
मुंबई,
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सुदानी नागरिकाकडून १७ किलो रक्तचंदन हस्तगत करण्यात आले आहे. विमानतळाची सुरक्षा पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ही कारवाई केली.

 
अलझैन मुस्तफा अलझैन सलीम हा प्रवासा इथिओपिन एअरवेजच्या विमानाने मंगळवारी पहाटे आदिस अबाबा येथे जाणार होता. त्यावेळी सुरक्षा तपासणी क्षेत्रात सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकांना त्याच्याबद्दल संशय आला. अधिक तपासणीत एका प्लास्टिकच्या पिशवीत त्याने १७ किलो रक्तचंदन लपवल्याचे आढळून आले. हे रक्तचंदन कुठून आणले, याबाबत तो विस्तृत माहिती देऊ शकला नाही. यामुळे सीआयएसएफने तात्काळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर संबंधित प्रवासी व ते रक्तचंदन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.