फॉर्म्युला वन विजेता शूमाकर करणार सेल थेरपी

    दिनांक :10-Sep-2019
लंडन, 
सातवेळचा फॉर्म्युला वन विश्व विजेता रेसर मायकेल शूमाकर सेल थेरपी शस्त्रक्रियेसाठी पॅरिसमध्ये दाखल झाला आहे. 
 
 
50 वर्षीय शूमाकरला डिसेंबर 2013 साली जबरदस्त अपघात झाला होता, या अपघातात शूमाकरचे हेल्मेट ताडकन मोडले होते व त्याचय डोक्याला जबर दुखापत झाली. तेव्हापासून शूमाकर सार्वजनिक स्थळी दिसत नाही. फ्रान्सच्या ली पेरीसन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पॅरिसच्या जॉर्जिस-पॉम्पिडोऊ हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र हॉस्पिटलकडून शूमाकरच्या शस्त्रक्रियेविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्याच्या संपूर्ण प्रणालीमध्ये एक दाहक-विरोधी प्रभाव प्राप्त करण्यासाठी स्टेम पेशी देण्यात येणार असल्याचे एका सूत्राने सांगितले. फेरारी स्टार शूमाकर याच्यावर यापूर्वीही अशा तर्‍हेच्या शस्त्रक्रिया दोनवेळा करण्यात आला होत्या.