खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ

    दिनांक :10-Sep-2019
- पांढर्‍या सोन्याला 5555 भाव 
 
 
अमरावती, 
एकादशीच्या शुभपर्वावर सोमवारी अमरावतीत खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला असून कापसाला 5555 रुपये भाव निश्चित करण्यात आला. सागर इंडिस्ट्रीजचे मालक सागर पमनानी यांच्याद्वारे अडते नवलकिशोर मालपाणी यांच्याकडून कापूस खरेदी करण्यात आला. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न होणार आहे.
 
पांढरे सोने खरेदी विक्रीचा मुहूर्त हा विदर्भात अडते नवलकिशोर मालपाणी यांच्याच दुकानात ठरला जातो. त्यानुसार खरेदी करणार्‍यांना व शेतकर्‍यांना समोर बसवून कापसाचे भाव ठरविण्याची परंपरा मालपाणी यांची आहे. एकादशीच्या पर्वावर नवलकिशोर मालपाणी यांच्या दुकानातून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.कापसाची विधिवत पूजा करून यावेळी खरेदीदार आणि शेतकरी यांनी मिळून 5555 रुपये भाव निश्चित केला. स्थानीक सागर इंडस्टीजचे मालक सागर पमनानी यांनी नवलकिशोर मालपानी यांचेकडून कापूस खरेदी करून शुभारंभ केला.