अभिनेत्री रवीना टंडन आजी होणार

    दिनांक :10-Sep-2019
मुंबई,
'नच बलिये' कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. रवीना टंडनची दत्तक मुलगी छाया आई होणार आहे. रविनानं छायासाठी डोहाळे जेवणाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट पूजा मखीजानं हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रवीना टंडननं १९९५मध्ये छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होतं. २००४साली रवीनाचं अनिल थडानीसोबत लग्न झाल्यानंतर त्यांना राशी आणि रणबीर ही दोन मुलं आहेत. रवीनानं पूजा आणि छाया दोघींचाही सांभाळ अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे केलाय. २०१८साली गोव्यात छायाचा लग्नसोहळाही मोठ्या थाटात पार पडला होता. त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाची तयारीही रवीनानं स्वतः पुढाकार घेत केली आहे.