भंडारा जिल्ह्यात पुरपरिस्थिती भयंकर

    दिनांक :10-Sep-2019
भंडारा,
मध्य प्रदेशातील संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती बिकट झाली आहे. कालच्या तुलनेत आज यात वाढ झाली असून अनेक गावांना पाण्याने वेढले असून काही वस्त्यामध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भंडारा शहराला लागून असलेल्या भाजी मंडीला पाण्याने वेढले आहे.