ब्रम्हपुरी तालुक्यातले लाडज गाव दरवर्षी करते पुराचा सामना

    दिनांक :10-Sep-2019
दिलीप शिनखेडे  
 
ब्रम्हपुरी, 
ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे वैनगंगा नदीतील एक बेटच आहे या गावाचे जवळ नदीचा एक फाटा असल्यामुळं गावाच्या
सभोवताल वैनगंगा नदी वाहते. सध्या गोसेचे पाणी सुटल्यामुळे लाडज पुराने वेढले आहे गावात किंवा बाहेर जाण्यासाठी बोटी शिवाय पर्याय नाही. यागावाचे 1962च्या महापूरनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सावंगी येथे पुनर्वसन झाले. आहे तिकडे जायलासुद्धा डोग्याचाच वापर करावा लागतो.  डोगा उलटून अनेक दुर्घटनापण झाल्या आहेत. दरवेळी यागावला धोकादायक स्थिती असते. आपत्ती व्यवस्थपन चमूने लाडज येथे बोटीने जाऊन वैद्यकीय मदत केली. पुरानंतर येथील जमिनीवर मोठ्या प्रमाणात गाळ बसतो. सुपीक जमीन असल्याने लाडज वासी धोका पत्करून, प्रसंगी झाडावर राहून गाव सोडत नाही पिंपळगाव,
चिखळगाव, येथील शेतकऱयांच्या जमिनी लाडज शेत शिवारात आहेत ते सुद्धा पूर पावसात डोग्याचा वापर करतात.