मोहम्मद शमीच्या वॉरंटला न्यायालयाची स्थगिती

    दिनांक :10-Sep-2019
कोलकाता,
 शमीविरोधात पत्नी हसीन जहाँने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरुद्ध कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषणप्रकरणी तक्रार केली होती . या प्रकरणी न्यायालयाने  गेल्याच आठवड्यात शमी आणि त्याचा भाव विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पश्चिम बंगालमधील एका जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.
 
 
जिल्हा न्यायालयाने  १५ दिवसांत शरण येण्याचे आदेश शमीला दिले होते. अलीपूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी शमीविरुद्धच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती शमीचे वकील सलीम रहमान यांनी दिली.