'स्थागुशा'च्या कारवाईत अवैध दारुसाठा जप्त

    दिनांक :10-Sep-2019
ग्रामीण पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह
  
 
कारंजा लाड,
कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलुवाडा येथे दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 14 हजार रुपयाचा अवैध दारुसाठा जप्त केला असून, दोघांवर दारुबंदी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. स्थागुशाच्या या कारवाईने ग्रामीण पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह लागले आहेत.
 
तालुक्यातील शेलुवाडा येथील ढाब्यावर देशी दारुची अवैध विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरुन सदर ठिकाणी धाड टाकली असता ढाब्याचे मालक नवलकिशोर जयस्वाल (वय 35) यांच्याकडून 47 नग देशी दारु 3692 रुपये किंमतीची देशी दारु जप्त केली. तर दुसर्‍या कारवाईत अमोल जयस्वाल (वय 35) रा. शेलूवाडा यांचेकडून 192 नग देशी दररु संत्रा किंमत 9984 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्याने कारंजा ग्रामीण पोस्टेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.