कॅन्सरला हरवून ऋषी कपूर मायदेशी परतले

    दिनांक :10-Sep-2019
मुंबई,
 सुमारे वर्षभर कर्करोगाशी यशस्वी लढा दिल्यानंतर ऋषी कपूर पत्नी नीतूसह सोमवारी रात्री न्यूयॉर्कहून भारतात परतले.  गेल्या वर्षभरापासून ते न्यू यॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत होते.
 
 
न्यू यॉर्कमध्ये असतानाही ऋषी कपूर सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात होते. उपचारांदरम्यानच्या काळात ऋषी कपूर यांची पत्नी नीत कपूर याही त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्येच होत्या. जे सेलिब्रिटी तेथे जात, ते ऋषी कपूर यांची भेट घेत होते. रणबीर आणि आलियादेखील अधून मधून ऋषी कपूर यांना भेटायला जात. अभिनेते अनुपम खेर यांची तर ऋषी कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये अनेकदा भेट झाली आहे. खेर यांनीही ऋषी कपूर यांच्या सुखरूप घरी परतण्याबद्दल ट्विट करून शुभेच्छा दिल्या.