संजूबाबा पडला पूजाच्या प्रेमात, बॉलिवूडमध्ये चर्चा

    दिनांक :10-Sep-2019
बॉलिवूडचा संजूबाबा उर्फ संजय दत्ता त्याच्या चित्रपटांपेक्षा अफेअरमुळे बऱ्याच वेळा चर्चेत होता. त्याच्या चित्रपटांतील भूमिकांपेक्षा लव्ह लाईफबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वीच संजय दत्तने मान्यताशी तिसरे लग्न केले. आता पुन्हा एकदा संजय दत्तचा एका मुलीला आय लव्ह यू बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
 
 
 
संजय दत्तचा हा व्हिडीओ टीव्ही क्वीन एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये संजय दत्त पूजा नावाच्या मुलीशी रोमॅन्टीक अंदाजात लपून-छपून बोलताना दिसत आहे. दरम्यान संजूबाबाची नजर अचानक कॅमेरवर जाते आणि तो चिडून कॅमेरा बंद करण्यास सांगतो. त्यानंतर संजूबाबा तिला डेटवर येण्यास विचारताना दिसत आहे. संजूबाबा नक्की कोणत्या मुलीशी बोलत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला आहे. संजूबाबा ज्या पूजाशी बोलत आहे ती पूजा म्हणजे आयुषमान खुरानाचे ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील पात्र आहे. संजूबाबाचा हा अंदाज पुन्हा पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असल्याचे म्हटले जात आहे.
हा व्हिडीओ शेअर करत एकता कपूरने ‘मुन्ना भाईदेखील ड्रीम गर्लला भेटण्यासाठी उत्सुक आहे’ असे कॅप्शन दिले आहे. आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुषमान कॉल सेंटरमध्ये नोकरी करण्यासाठी एका मुलीची भूमिका साकारतो आणि फोनवर मुलीच्या आवाजात बोलतो. त्याच्या या पात्राचे नाव पूजा असे आहे. या चित्रपटात आयुषमानसह नुसरत भारुचा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.