ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. १० सप्टेंबर २०१९

    दिनांक :10-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांगनुसार दिनांक १० सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १९ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:१८
 
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:३९ ते १९:५१
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ - १८:३९ ते २१:००
⭐ निशीथ काळ - २४:०८ ते २४:५६
⭐ राहु काळ - १५:३७ ते १७:०९
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४५ ते दु.०३:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी दही व मसूर खावू नये.
या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०० ते १२:३२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३२ ते १४:०३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३७ ते १५:२४
पृथ्वीवर अग्निवास २६:५५ पर्यंत.🔥
 
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी
वार - मंगळवार
नक्षत्र - उ.षाढा (१३:०५ नंतर श्रवण)
योग - शोभन
करण - बव (१४:२४ नंतर बालव)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - विष्णुपरिवर्तनोत्सव,शक्रध्वजोत्पन, वंजुलीव्रत, दधिव्रत समाप्ती,दुग्धव्रतारंभ,वामन जयंती,कटदानोत्सव,श्रवण - वामन - शक्र द्वादशी,त्रिपुष्करयोग १३:०५ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र व गणेश सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला केळ्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.