उर्मिला मातोंडकरांनी दिला काँग्रेस सदस्त्वाचा राजीनामा

    दिनांक :10-Sep-2019
उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेससोबतच असणार आहे असे त्या पक्षप्रवेशादरम्यान म्हणाल्या होत्या.
परंतु त्यांनी आज तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच 16 मे रोजी त्यांनी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे.