एमआयएमसोबत युती तुटल्याने नुकसान नाही : प्रकाश आंबेडकर

    दिनांक :11-Sep-2019
दर्यापूर,
लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजातील मते मिळाली नाहीत. तरीदेखील काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे. मात्र, एमआयएमसोबत झालेल्या तुटातुटीचा काही फरक पडणार नाही. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजातील 25 उमेदवार असतील, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दर्यापुरात बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
 
 
दर्यापुरात अण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी निमित्य वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मातंग समाज सत्ता संपादन प्रबोधन मेळाव्याचे आयोजन आज बनोसा येथील शेतकरी सदन येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना अ‍ॅड आंबेडर पुढे म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे व राज्य सहकारी बँकेतला घोळ बाहेर काढण्यात आल्याने यात गुंतलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादीच्या आमदारांनी कारवाईच्या भीतीने भाजपात प्रवेश घेतला असून आता ही कारवाई थंड पडेल. वंचित आघाडी या घोटाळ्यांना बाहेर काढून त्यात सहभागी असणार्‍यांना शासन करेल. सत्ता ही गुरुकिल्ली आहे. संविधानुसार जे मिळाल त्याची व्यवस्थित अमलबजावणी करा. इकडे खूप बोलणारे आमदार विधानसभेत मात्र मौनीबाबा होतात ते आपली बाजू मांडत नाहीत, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.