"गढ्ढो के शहर मे आपका स्वागत है"; नागरिकांचा पालिकेविरोधात संताप

    दिनांक :11-Sep-2019
- अचलपूर-परतवाडा रस्त्यावर लावल्या पाट्या 

 
 
अचलपूर, 
जुळ्या शहरातले नागरिक नगरपालिकेच्या तुघलकी कारभाराणे त्रस्त झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते असो वा आतील रस्ते संपुर्ण जुळे शहर खड्डेमय झाले असून कुठे कुठे तर 6 इंच ते 1 फुट पर्यंत खोल खड्डे पडले आहे. नागरीक एवढे त्रस्त्र झाले आहे की, गावात चौकाचौकात ‘गढ्ढो के शहर मे आपका स्वागत है’ अशा प्रकारचे बोर्ड नागरीकांनी लावले आहे.
 
 
अचलपुर नगरपालिका रस्ते, नाल्या, लाईट, पाणी पुरवठा, स्वच्छता अशा सर्वच क्षेत्रात नागरीकांना सुविधा देण्यात असफल ठरली आहे. शहरात काही ठिकाणी नागरीकांनी त्रासुन निरनिराळया पाटया लावल्या आहे. खड्डे के शहर मे आपका स्वागत है, बैलबंडीच्या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचे मजकुर असलेल्या पाटया लावण्यात आल्या आहे. त्या सोशल मिडीयावर एवढया व्हायरल झाल्या की, जो तो नगरपालिका, नगरसेवक, प्रशासन, नगराध्यक्षाचा निषेध करू लागले आहे. अनवरपुरा भागातील पेंटर रशीद शेख यांनी तर स्वतः पाटी रंगवत काही ठिकाणी स्वतःच्या मो.नंबर निशी लावल्या आहेत.
 
 
अमरावती जिल्ह्यातल्या एकमेव ‘अ’ वर्ग नगर पालिका असलेल्या अचलपुर- परतवाडा शहरातील रस्त्यांची एवढी दुरावस्ता झाली की, रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता सांगणे कठीण झाले आहे. प्रत्यक्ष तक्रारी करूनही निगरगट्ट प्रशासन थातूर मातुर कारवाही करत काही भागात मुरूम माती टाकुण खड्डे बुजवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत आहे.
 
 
जुळ्या शहरातील मुख्यपोष्ट ऑफीस टपालपुरा ते सुलतानपुरा, बहीरम रोड ते गांधीपुल व अन्य काही भागात नावालाही रस्ते राहीलेले नाही. काही डांबर रोड तर एक ते दोन वर्ष आधी तयार केले होते. त्यांची खुप दुरावस्ता झाली आहे. डांबर होते की ऑईल होते माहीत नाही पण, रस्तेच खरडून गेले आहे. त्यामुळे जनतेची फसवणूक ठेकेदार , अधिकारी, नगरसेवकांनी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.