शेवग्याची लागवड

    दिनांक :11-Sep-2019
 
 
तसं पाहिलं तर शेवग्याची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. शेवग्यासाठी हलकी, माळरानाची तसंच डोंगरउताराची जमीन उपयुक्त ठरते. या जमिनीचा सामू 6 ते 7.5 असावा. ही लागवड अभिवृध्दी फाटे कलम अथवा बियांपासून रोपं तयार करून केली जाते. लागवडीकरता हेक्टरी 500 ग्रॅम बियाणं पुरेसं होतं. साधारणपणे एक ते दोन महिन्यांची रोपं लागवडीकरता वापरावी. लागवडीपूर्वी विशिष्ट आकारात खड्डे तयार करून त्यात चांगलं कुजलेलं शेणखत, सुफला, फॉलीडॅल पावडर तसंच चांगली माती टाकावी. शेवग्यावर किडी वा रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनाचा खर्च तुलनेने कमी असतो. मात्र, चांगला दर मिळत असल्याने हे पीक फायदेशीर ठरतं.