पीठगिरणी चालू करताच विजेच्या धक्क्याने मालकाचा मृत्यू

    दिनांक :11-Sep-2019

उंबर्डा बाजार,
धनज बु. पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या ग्राम मेहा येथील पीठगिरणी मालकाचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना आज बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

 
 
ग्राम मेहा येथील प्रेमसिंग हनुमानसिंग चंदेल हे पीठगिरणी च्या माध्यमातून आपल्या कुटूबियांचे पालन पोषण करून चरितार्थ चालवित होते. नेहमी प्रमाणे आज ते पीठगिरणीत गेले असता विजेचा धक्का लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही सेवाभावी नागरिकांनी प्रेमसिंग यांना धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. मृतक प्रेमसिंग यांचे मागे पत्नी, तीन मुली, आई, वडील, तीन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. सुस्वभावी प्रेमसिंग आकस्मिक जाण्याने मेहा ग्रामवासीयावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
 
या प्रकरणी धनज बु. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार तसरे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमा दार रामचवरे करीत आहे.