कार व पिकअप व्हॅनची धडक; पाच जण जखमी

    दिनांक :11-Sep-2019
कुरुम,
कार व बोलेरो या दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम नजीक घडली. अपघातात जखमी नागपूरचे रहिवासी आहेत. 

 
 
 
आज बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वर माना फाट्यानजीक कार व पिकअप व्हॅन मध्ये जबर धडक झाली. या अपघातात रामकृष्ण संतोष वाघ, सुनंदा वाघ, सुनील शिरपूरकर, चित्रा शिरपूरकर, अतुल अशोक इंदूरकर सर्व राहणार नागपूर हे जखमी झाले अमरावतीहुन अकोल्याकडे जाणाऱ्या एम एच ३१ डी व्ही ५१०४ या कारला विरुद्ध दिशेने येणारे पिकअप व्हॅनने माना फाट्यानजीक जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. अपघातानंतर दोन्ही वाहन रस्त्यावर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार मधील जखमींना अमरावती येथे पुढील उपचाराकरिता पाठविले.