बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू

    दिनांक :11-Sep-2019
भंडारा, 
गावाजवळील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (10 सप्टेंबर) रोजी साकोली तालुक्यातील सराटी गावात घडली. निखील खांडेकर व हिमांशु खोब्रागडे अशी मृतकांची नावे आहेत. 

 
 
जिल्हयात सध्या पुरपरिस्थिती आहे. नाल्यांची पातळी प्रचंड वाढली आहे. अशावेळी नाल्यांवर असलेल्या बंधाऱ्यात पोहायला जाणे, धोकाचेच. मात्र असे असतानाही साकोली तालुक्यातील सराटी येथील निखील केशव खांडेकर वय 16 व हिमांशु प्रमोद खोब्रागडे, वय 18 हे दोघे जण 10 रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास गावातील शेताजवळ असलेल्या बंधा-यात पोहायला गेले. लवकर घरी न आल्याने शोधाशोध करण्यात आली. दरम्यान संध्याकाळी 7 वाजता दोघांचेही मृतदेह बंधा-यात आढळून आले. निखील हा अकरावीचा तर हिमांशु हा पॉलीटेक्नीक चा विद्यार्थी होता. मित्रांच्या अशा दुर्देवी मृत्युमूळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटूंंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.