केबीसीला मिळाला पहिला करोडपती

    दिनांक :11-Sep-2019
कौन बनेगा करोडपती या शोला त्यांच्या ११ पर्वातील पहिला करोडपती मिळाला आहे. या व्यक्तिचे नाव सनोज राज असे आहे. बिहारमधील अतिशय दुर्गम भागातून आलेल्या सनोजने आतापर्यंत एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता तो सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. जर या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले तर सनोज ११व्या पर्वातील सात कोटी रुपये जिंकणारा खेळाडू ठरणार आहे.
 
 
 
केबीसीच्या फेसबुक पेजवरुन सनोज राज याने एक कोटी रुपये जिंकल्याला प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोत कोट्यधीष झालेला सनोज सात कोटी रुपयांच्या प्रश्नावर विचार करताना दिसत आहे.
कोण आहे सनोज राज?
सनोज बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील ढोंगरा गावातील रविवासी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला सनोज तंत्रज्ञान विषयात पदवीधर आहे. तो आय.ए. एस परिक्षेची तयारी करत होता. दरम्यान त्याने कुटुंबाच्या आग्रहाखातर केबीसीमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. अथक परिश्रम व दिवसरात्र अभ्यास करुन त्याने केबीसीची तयारी केली परिणामी आज तो कोट्यधीष झाला आहे. सनोज राजचा हा विशेष भाग येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला सोनी वाहिनीवर रात्री नऊ वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. केबीसीचे चाहते देखील या पहिल्या करोडपतीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.