चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

    दिनांक :13-Sep-2019
मुलाच्या तक्रारींवर बापावर गुन्हा दाखल
 
पुलगाव,
येथील बालाजी मंदिर समोरील अशोक नगर येथे संतोष रामभाऊ चाडगे वय ४५ याने संशयाच्या नादात पत्नी वैशाली संतोष चाडगे  हिची रात्री १ ते४ च्या सुमारास भाजी कापाच्या चाकूने गळा कापून निर्घृण हत्या केली असून पुलगाव पोलिसांनी मुलगा आशय संतोष चाडगे याच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतक वैशालीचा पती काहीच काम करीत नसल्याने नवरा बायकोमध्ये रोज वाद होत असे. घटनेच्या एक दिवसआधी संतोष आणि पत्नी वैशाली या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. संतोषने वैशालीला मारहाणही केली.
 

 
 
आज संध्याकाळी मुलाने हट्ट केल्यामुळे गणपती विसर्जन आणि मीना बाजार पाहण्याकरीता वैशाली आपल्या मुलांना घेऊन पाहण्यास घरा बाहेर पडली काही वेळ झाल्यावर मुले पाहिले घरी आली आणि पत्नी त्याच्या मागोमाग थोड्या वेळाने घरी आली, त्यामुळे पत्नीला विचारत संतोष ने संशयाच्या भोवऱ्यात अडकून वाद घातला की तू इतका वेळ कोठे होती आणि येण्यास का उशीर केला दोघात पुन्हा वाद झाला नंतर दोन्ही मुले आशय वय१८ आणि सुजल वय१३ झोपल्यानंतर भाजी कापच्या चाकूने रात्री १ते ४ च्या सुमारास वैशालीच्या गळ्यावर वार करून हत्या केली. या घटनेची संपूर्ण माहिती तक्रार मृतकाचा मोठा मुलगा आशय संतोष चाडगे याने पुलगाव पोलीस स्टेशन ला नोंदवून तपास पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड करीत असून श्वान पथक बोलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळाली तो पर्यंत आरोपी अटक नसल्याची माहिती पुलगाव पोलिसानी दिली.