वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू

    दिनांक :13-Sep-2019
वर्धा,
 
गणेश विसर्जनादरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची  आहे. पहिली घटना वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात घडली.   तालुक्यातील जुनापाणी येथे आज गणपती विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली असून सायंकाळी उघडकीस आली. युवकाचा पोहताना विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गुणवंत यादव गाखरे (२४) असे मृतकाचे नाव आहे.
दुसरी घटना अकोला जिल्ह्यात घडली. गणेश विसर्जन करताना गुरूवारी शिवणी येथील चंदन मोरे या युवकाचा एमआयडीसी परिसरातील खदानीत बुडून मृत्यू झाला. या युवकाचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला.
शिवणी परिसरातील चंदन मोरे हा युवक गुरूवार, 12 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता.खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.