भामरागड तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप

    दिनांक :14-Sep-2019
डॉक्टर हेगडेवार जन्मशताब्दी सेवा समिती व आर्य वैश्य कोमटी समाज तर्फे भामरागड तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप व आरोग्य तपासणी ,औषधी वाटप.
अहेरी,
गेल्या महिन्याभरात भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.पुराचे पाणी घरात,दुकानात घुसल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते.तालुक्यातील पुरबाधित गावातील नुकसांनग्रस्तांना काल.(दि.13सप्टेंबर)ला डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर व आर्य वेश्य कोमटी समाज गडचिरोली तर्फे मदत किटचे वाटप व आरोग्य तपासणी आणि औषध वितरण करण्यात आले.
 
 
 
भामरागड तालुक्यात यावर्षी 1994 नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने हाहाकार उडाला होता.आठवडाभर पावसाच्या पाण्यात राहल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या मदत किट मध्ये तांदूळ,डाळ,, तेल,तिखट, मीठ आदींचा समावेश आहे.
समितीच्या कार्यकर्त्यांनी 800 मदत किट भामरागड,कृष्णार, आरेवाड़ा,कारंमपल्ली,फुलणार,मिरगुडवनंचा,पोयरकोठी, गुंडेसुर,हिणभट्टी, कोरपरसी,गुंडूरवाही,गुंडेनूर,जुवी, हलवेर,कियर,पल्ली आदी. गावांतील नुकसाणग्रस्तांना देण्यात आली.
यासोबतच ताडगाव,कारंमपल्ली,हिदूर या गावात डॉ. प्रवीण येरमे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर,डॉ.निखिल भागवत, डॉ.के.एल.रॉय यांनी 250 रुगणाची आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले.
या सर्व कार्यक्रमात डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरचे पदाधिकारी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अहेरी, आलापल्ली व भामरागड येथिल स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.