संतधार पाऊसामुळे बैलांचा गोठा पडुन चार जनावरांचा मूत्यु

    दिनांक :14-Sep-2019
ब्रम्हपुरी,
ब्रम्हपुरी तालुक्यातील बोथली येथील शेतकरी धनराज नाकतोडे यांचा बैंलाचा गोठा काल सुरू असलेल्या संतधार पाऊसामुळे पडुन यामध्ये दोन मोठे बैल, एक गाय व गोरा अशा चार जनावरांचा काल सकाळी पाच वाजता मुत्यु झाला. गावातील नागरिकांच्या सहकार्याने जनावरे बाहेर काढण्यात आले. शेतीचा हंगाम सुरू असुन या शेतकर्‍यांवर खुप मोठा संकट आले. शेतकर्‍यांचे अश्रु आपल्या जनावरांकरिता ढाळत होता. यामध्ये धनराज नाकतोडे यांचे अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले असुन या शेतकऱ्यांसमोर शेती कशी करायची हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकर्‍यांला शेतीच्या कामे करण्यासाठी बैंल जोडी खरेदी करिता शासनाने त्वरित शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.