भाजपाच्या ओबीसी मेळाव्याचा ओबीसी महासंघाने केला निषेध

    दिनांक :14-Sep-2019
चामोर्शी,
जिल्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्क्यांवर आणण्यात आलेले आहे. त्यामुळे सन २००३ पासून वर्ग ३ व ४ पदभरतीतुन ओबीसी प्रवर्गातून बाद झाले आहेत. जिल्ह्यातील ४२.५ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ओबीसी संघटनांचे व ओबीसी समूहातील पोट जातीय संघटनांचे कित्येक आंदोलन होत असून आजपर्यंत आलेल्या सत्तेवर विविध पक्षाना ओबीसीची दिशा भूल करण्यात आलेली आहे.
 
 
 
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ओबीसींच्या आरक्षण या मुद्द्यावर भाजप सत्तेत आली असून या दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याकरिता ४ ते ५ दिवस बाकी असताना ५ वर्षांमध्ये कधीही ओबीसींचा महामेळावा न घेता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळावा घेत ओबीसींचा राजकारणाकरिता वापर करीत असल्याचा आरोप ओबीसी संघटनेने केले आहे. या दरम्यान यांचा निषेध म्हणून भाजप पक्ष्याच्या मेळाव्यातच ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेऊन  नारे बाजी करून निषेध केला. याप्रसंगी निषेध करतांना ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसीं महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे, राहुल भांडेकर, पंकज खोबे, मनोज पोरटे, रामेश कोठारे, गोकुलदास झाडे, पियुष गव्हारे, गणेश भोयर, वामन किन्हेकर, संदीप तिमांडे, तुषार मंगर, तुकाराम आभारे, लोमेश भगत, देवेंद्र सातपुते, संदीप सहारे, स्वप्नील कुकडे, माळी समाज संघाचे जिल्हा संयोजक सुनील कावळे, मारोती वनकर, धनराज वासेकर, आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.