'विकास पर्वाचे ५ वर्ष' पुरवणी लोकार्पण सोहळा संपन्न

    दिनांक :15-Sep-2019
आरमोरी,
आरमोरी येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात आज दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आमदार कृष्णा गजबे यांच्या विकास पर्वाची पाच वर्ष या विकास पुरवणीचा लोकार्पण सोहळा इंदिरा गांधी चौकात घेण्यात आला या लोकार्पण सोहळ्याच्या आरमोरी नगर परिषदेचे अध्यक्ष पवन  नानावरे नगरपरिषदेचे आरोग्य सभापती भारत बावनथडे पाणीपुरवठ्याचे सभापती विलास पारधी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार भाजपा तालुकाध्यक्ष नंदू  पेटेवार पंचायत समिती सदस्या निता ढोरे भाजपा जिल्हा सचिव सुनील नंदनवार भाजयुमोचे पंकज भाऊ खरवडे तरुण भारत तालुका प्रतिनिधी दौलत धोटे  या सर्वांच्या उपस्थितीत विकास पर्वाची पाच वर्षे या पुरवणीच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला.