अमरावतीत जुन्या वादातून युवकाची हत्या

    दिनांक :15-Sep-2019
यशोदा नगर येथील घटना
सर्व आरोपी गजाआड
 
अमरावती,
जुन्या वादातून यशोदानगर चौकात शनिवारी रात्री पाच जणांनी एका युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. या घटनेमुळे यशोदानगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. हल्लेखोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
भूषण भांबुर्डे (वय 20) रा. उत्तम नगर असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास पंचशील नगर परिसरातील रहिवासी रितिक भालेकर, मंगेश तायडे, अक्षय भालेकर, व इतर दोघे अशा पाच जणांनी भूषण भांबुर्डे याच्यावर यशोदानगर चौकात हल्ला चढविला. यावेळी भूषण भांबुर्डे याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस येताच पाचही आरोपींनी पळ काढला. भूषण भांबुर्डे याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
 
दरम्यान, भूषण भांबुर्डे याचे रितिक भालेकरचे जुन्या वादातून भांडण झाले, असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री भूषण भांबुर्डे यशोदानगर चौकात आला असता रितिक भालेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी भूषणवर हल्ला चढविला. या घटनेनंतर यशोदानगर परिसरात रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. रविवार सकाळ पर्यंत सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.