ग्यारापत्ती जंगलात दोन नक्षल्यांना कंठस्नान

    दिनांक :15-Sep-2019
 
 
 
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या नरकसा जंगल परिसरात आज पहाटे पोलिसांच्या सी- ६० पथकातील जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, सी- ६० पथकाचे जवान ग्यारापत्ती जंगलात कालपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, आज पहाटे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह व काही साहित्य आढळून आले.