किशोर खत्री यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपीचा कारागृहात मृत्यू

    दिनांक :16-Sep-2019
अकोला,
उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी, तसेच राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी रणजीतसिंह चुंगडे याचा आज पहाटे अमरावती जिल्हा कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला. 

 
 
चुंगडे याच्यावर अकोल्यातील पहिले बॉम्बकांड, टाडाचा विदर्भातील पहिला गुन्हा तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार आणि किशोर खत्री हत्याकांड यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच रणजितसिंह चुंगडे हा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख, कामगार सेनेचा माजी जिल्हाप्रमुख, इंटकचे नेते त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत.
  
अमरावती कारागृहात बंदी असताना रणजीतसिंह चुंगडे तणावात होता. या तणावामुळेच चुंगडेला हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.