मनमोहक न्यूझीलंड...

    दिनांक :17-Sep-2019
जगातील सर्वात कमी प्रदूषण असलेला देश तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाणही सर्वात कमी असलेला देश, अशी न्यूझीलंडची ओळख आहे. या देशाबद्दल अधिक जाणून घेणेही मनोरंजक आहे. न्यूझीलंड हा देखणा देश आहे. म्हणूनच या देशात जगातून लाखो पर्यटक दरवर्षी येतात. त्यासाठी न्यूझीलंडच्या सरकारने अनेक ठिकाणे विकसित केली आहेत. 

 
 
न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनला तुम्ही पार्क, संग्रहालय, वेलिंग्टन किल्ला, तलाव अशी अनेक ठिकाणे भटकू शकता. वेलिंग्टनमध्ये खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था आहे. भारतीय हॉटेल्सची उपलब्धता न्यूझीलंडमध्ये भरपूर आहे, शिवाय न्यूझीलंडमध्ये भारतीय लोकांची संख्यादेखील भरपूर आहे.
 
 
न्यूझीलंडचे इस्कॉन मंदिरदेखील एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, शिवाय स्वामिनारायण मंदिरदेखील फार सुरेख आहे.
 
 
न्यूझीलंडमध्ये एकूण जिवंत प्राण्यांमध्ये माणसांची संख्या केवळ पाच टक्के आहे, तर बाकी संख्या जनावरांची आहे. असे असले तरी येथे साप नाहीत. समजा एखादा साप दिसलाच तर त्वरित पोलिसात त्याची माहिती द्यावी लागते. या देशात जगातील सर्वात छोट्या आकाराचे डॉल्फिन आहेत आणि या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे किवी. 19 व्या शतकात येथे डॉल्फिनना समुद्री धोके तसेच खडकांपासून जहाजाचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. येथे लांडग्यांची संख्या नागरिकांच्या संख्येच्या नऊ पट आहे.
 
 
हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याची दोन राष्ट्रगीते आहेत. या देशाचा जन्म 800 वर्षांपूर्वीचा आहे. त्या पूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती. सर्वात कमी लोकसंख्येचा हा देश असून येथील लोकसंख्या आहे 45 लाख. मात्र, येथील नागरिकांना कारचा शौक मोठ्या प्रमाणात असल्याने या देशातील कार्सची संख्या आहे 25 लाख! हा देश शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.
 
 
माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक एडमंड हिलरी याच देशाचे होते. तसेच प्लॅस्टिक सर्जरीचा शोध लावणारे हेराल्ड गिल्डेज हेही याच देशाचे नागरिक. येथे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास करताना आवश्यक असल्यास युरेनियम तसेच थोरियम अशी भयानक स्फोटके जवळ बाळगण्याची परवानगी आहे, मात्र त्याचा स्फोट झाला तर 10 लाख डॉलर्स दंड भरावा लागतो.
 
 
या देशातील ब्ल्यू लेक नदीचे पाणी जगातील सर्वात शुद्ध मानले जाते. 1893 मध्येच या देशाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला व असा अधिकार देणारा जगातला हा पहिला देश ठरला! येथे समलैंगिक विवाहांना मान्यता आहे. या देशात एकही न्यूक्लीअर पॉवर स्टेशन नाही तसेच तुरुंगातील कैद्यांमध्ये 96 टक्के पुरुष कैदी आहेत. येथे नाताळ, गुड फ्रायडे, इस्टर संडे या सणांच्या दिवशी टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास बंदी आहे.3