आई-वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे अल्पवयीनाचा मृत्यू

    दिनांक :18-Sep-2019
कारंजा(घा),
ग्रामपंचायत भालेवाडी अंतर्गत येणाऱ्या आमले लेआउट मधील रहिवाशी तेजस बन्नगरे याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. तेजस हा झोपेत असताना त्याचा कोणत्या तरी कीटकाने चावा घेतला असेल असे समजून आई-वडिलांनी दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झळयामुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त कारणात येत आहे.     
 
 
मृतक तेजस हा अवघ्या १४ वर्षांचा होता. तसेच तो मॉडेल शाळेत आठव्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री ११ वाजताच्या दरम्यान तेजसला झोपेत सर्पदंश झाला. यामुळे त्याची झोप उघडली, जीव मळमळ करत असल्याचे त्याने आई- वडिलांना सांगितले. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता दोघांनीही त्याला कोणतातरी कीटक चावला असेल असे समजून सगळे झोपी गेले. काही वेळेनंतर तेजसला ओकाऱ्या झाल्यामुळे त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र त्याची प्रकृती आणखी खालावत गेल्याने रात्री दोन वाजताच्या सुमारास नागपुरातील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोंढाळी जवळ असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वेळेच्या आत त्याच्यावर उपचार करण्यात आले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.