अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या आरोपी गजाआड

    दिनांक :18-Sep-2019
मंगरुळनाथ,
वर्षभरापूर्वी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या आरोपीस पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव ता. शिरूर येथून अटक केली आहे. तसेच आरोपीसह आरोपीस सहकार्य करणार्‍या दोन महिला व अन्य एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 ऑगस्ट 2018 रोजी तालुक्यातील बालदेव येथील 45 वर्षीय फिर्यादिने पोलिसांत तक्रार दिली होती की, 26 ऑगस्ट 2018 चे रात्री फिर्यादीचे 17 वर्षीय मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले.अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असताना 16 सप्टेंबर 2019 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, सदर मुलगी व तिला पळवून नेणारा आरोपी धनराज शिवनाथ तायडे रा बालदेव हे रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे येथे राहत आहेत. अशा माहितीवरून पोलिसांनी या ठिकाणावरून सदर मुलगी व आरोपीस अटक केली. तसेच या प्रकरणात आरोपीला त्याची आई,बहीण व गणेश शंकर भगत यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चारही जणांवर गुन्हा दाखल केला.
 
 
यापैकी गणेश भगत हा फरार असून, अन्य तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त जिपोअ विजयकुमार चव्हाण, एसडीपीओ पियुष जगताप, ठाणेदार विनोद दिघोरे यांचे मार्गदर्शनात हेकॉ महादेव सोळंके व अरविंद सोनोने यांनी ही यशस्वी कारवाई केली.