मानवी वागणूक...

    दिनांक :19-Sep-2019
मुकेश जुनघरे
9049339068
 
माणसाने आयुष्यात कधीही लोभ करू नये. काही व्यक्तींना अशी सवय असते की, त्यांनी एखादे चांगले काम केले, तर ते प्रत्येकाला सांगत फिरत असतात- मी केले म्हणूनच असे झाले... मी केले म्हणूनच तसे झाले! अशा गोष्टी प्रत्येकांना सांगण्याची गरज आहे? हे आपल्या मनाला एकदा विचारून बघा! आणि मग जर सांगणे जरुरी असेल तर चांगले केले तेव्हाच का सांगायचे? वाईट केले तेव्हाही सांगा. जी गोष्ट चांगली झाली ती प्रत्येकांना सांगण्याची गरज नसते, ती न सांगतासुद्धा लोकांना माहिती होतेच! माणसाने कुठलीही गोष्ट करताना नि:स्वार्थ प्रयत्न करायला पाहिजेत. 

 
 
जर तुम्हाला वाटतं की, मी केलेले चांगले काम लोकांना सांगत फिरलो, तर लोकांना माझ्याबद्दल समजेल आणि माझी प्रसिद्धी वाढेल. पण असे नाही, लक्षात ठेवा! लोकांना जे बोलायचे आहे तेच ते बोलतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे आणि अन्य समाजसेवक यांनी नि:स्वार्थ होऊन समाजाची सेवा केली, म्हणजेच लोकांना मदत केली, त्यामुळेच ते, त्यांचे नाव आणि काम लोकांपर्यंत पोहोचले आहे. प्रत्येक माणसाने नि:स्वार्थपणे स्वतःला आणि समाजाला घडविण्याचा प्रयत्न करावा.
  • जो दुसर्‍यांबद्दल चांगला विचार करतो तो माणूस!
  • जो प्रत्येकांना मदत करतो तो माणूस!
  • जो मोठ्यांचा आदर आणि सन्मान करतो तो माणूस!
  • जो आनंदाने जीवन जगतो तो माणूस!