राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

    दिनांक :19-Sep-2019

 
सिरोंचा,  
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सिरोंचा तालुक्याचा दौरा केला, या दौऱ्यात त्यांनी जवळपास ७० कोटी रुपयांच्या निधीच्या विकासकामांचे शुभारंभ केले.
सिरोंचा येथे आदिवासी मुलांसाठी वसतिगृह २० कोटी, सिरोंचा-अंकीसा-आसरअली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण ३० कोटी, नगर पंचायत प्रशासकीय इमारत ४.५ कोटी,सिरोंचा नवीन बस स्थानक २.२७ लाख, मत्स्य सोसायटी इमारत ५० लाख , आसरअली ३३ kv सब स्टेशन ४ कोटी लोकार्पण,सोमनूर पर्यटन विकासासाठी ५ कोटी लोकार्पण, टेकडा पाणीपुरवठा योजना ९० लक्ष लोकार्पण,सिरोंचा नगर पंचायत अंतर्गत विविध रस्ते व नाली बांधकाम २ कोटी रुपये अशा जवळपास ७० कोटी रुपयांचा निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम काल राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले.