धानोरा बु. येथे विजेचा धक्क्याने इसमाचा मृत्यू

    दिनांक :19-Sep-2019
मानोरा,
धानोरा बुद्रुक येथील विलास तुळशीराम पटाळे 18 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या राहता घरात पंख्यामध्ये आलेल्या विजेचा प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. तुळशीराम पटाळे हे शेतकरी असून त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. रात्री अचानक पंखख्यामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. घरातील विजवाहक अंतर्गत वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या एकमेकांच्या संपर्कात येऊन अधिकांश असे प्रकार घडत असल्याचे महाराष्ट्र विज वितरण कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मानोरा पोलिस स्टेशनचे कुरकुरे व साठे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्रीरामे ही हजर होते.